Video : ठाणे-घोडबंदरच्या दुरवस्थेबाबत ऋतुजा बागवेची पोस्ट; प्रताप सरनाईकांना म्हणाली…
मुंबईतील रस्त्यांची दुरवस्था कायम आहे, विशेषतः ठाणे-घोडबंदर रोडची स्थिती अत्यंत वाईट आहे. अनेक मराठी कलाकारांनी या रस्त्याबाबत तक्रारी केल्या आहेत. अभिनेत्री ऋतुजा बागवेनेही सोशल मीडियावर खड्ड्यांचा व्हिडीओ शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. तिने व्हिडीओ शेअर करत “अत्यंत सुंदर रस्ता घोडबंदर रोड” म्हटलंय आणि प्रताप सरनाईक यांचा उल्लेख करीत “पाठीचा मणका अजून शाबूत आहे, म्हणून साष्टांग नमन” असंही लिहिलं आहे.