‘साथ निभाना साथिया’ फेम गोपी बहू अडकली लग्नबंधनात, गाजावाजा न करता केलं लग्न
'साथ निभाना साथिया' फेम जिया मानेकने नुकतेच अभिनेता वरुण जैनसोबत लग्न केले आहे. जियाने सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. जिया आणि वरुणने साध्या पद्धतीने लग्न केले असून, जियाने कॅप्शनमध्ये नव्या प्रवासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. वरुण जैन हा देखील हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता आहे.