महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या समीर चौघुलेंचं आवडतं स्किट कोणतं? शेअर केला व्हिडीओ
सध्या टेलिव्हिजनवर अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रम आहेत, त्यात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा विनोदी शो प्रेक्षकांना खळखळून हसवतो. या शोमधील समीर चौघुले यांनी अनेक विनोदी स्किट्स सादर केली आहेत. त्यांचं आवडतं स्किट म्हणजे चार्ली चॅप्लिनचं, ज्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. सोशल मीडियावरही सक्रिय असलेल्या समीर यांनी चाहत्यांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांची उत्तरं इन्स्टाग्रामवर शेअर केली आहेत.