नवीन मालिका सुरू होण्यापूर्वी समृद्धी केळकरने शेअर केले शूटिंगच्या सेटवरचे खास क्षण
'स्टार प्रवाह' वाहिनी लवकरच 'हळद रुसली कुंकू हसलं' ही नवी मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. या मालिकेत समृद्धी केळकर व अभिषेक रहाळकर मुख्य भूमिकेत आहेत. यामध्ये समृद्धी गावातील मुलगी असून तिचं स्वाती नाव असलेल्या तिच्या गायीशी घट्ट नातं असतं. मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून समृद्धीने तिच्या गायीसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. मालिकेचं शूटिंग कोल्हापुरात सुरू आहे.