“आज एक महिना झाला…”, प्रिया मराठेच्या आठवणीत शंतनू मोघेची भावुक पोस्ट; म्हणाला…
मराठी अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनानंतर तिचा पती शंतनू मोघेने पहिल्यांदाच तिच्या आठवणीत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. प्रियाचा कर्करोगामुळे ३१ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. शंतनूने तिच्या आठवणीत काही फोटो शेअर करत, तिच्या जाण्याने झालेल्या दु:खाबद्दल भावना व्यक्त केल्या. त्याने सर्व मित्र, कुटुंबीय आणि चाहत्यांचे आभार मानले. सध्या शंतनू 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत काम करत आहे.