शिवानी सोनारच्या नव्या मालिकेचा मुहूर्त पडला पार, सहअभिनेत्रीने शेअर केला पहिला फोटो
स्टार प्रवाह आणि झी मराठीने नवीन मालिका जाहीर केल्या आहेत. झी मराठीची 'तारिणी' मालिकेत शिवानी सोनार मुख्य भूमिकेत आहे. शिवानीसोबत अभिज्ञा भावे आणि स्वराज नागरगोजेही प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. मालिकेचा मुहूर्त पार पडला असून अभिज्ञाने सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. 'तारिणी'च्या प्रोमोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.