भटक्या कुत्र्यांच्या निर्णयाला गायकाचा पाठिंबा, म्हणाला, “इतकं प्रेम आहे तर घरी घेऊन जा…”
दिल्लीतील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाने सर्व भटके कुत्रे पकडून आश्रयस्थानांमध्ये ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाला अनेकांकडून विरोध होत आहे. बॉलीवूडसह मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध पोस्ट शेअर केल्या आहेत. मात्र, गायक राहुल वैद्यने या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. त्याने म्हटले की, "भटक्या कुत्र्यांवर प्रेम असेल तर त्यांना घरी घेऊन जा." तसेच, न्यायाधीशांच्या निर्णयाला गंभीर समस्या म्हणून पाहण्याचे आवाहन केले आहे.