“तिनं लग्नच लहानपणी केलं…”, चेतन वडनेरेची कृतिका देवबद्दल प्रतिक्रिया; म्हणाला…
'लपंडाव' मालिकेत चेतन वडनेरे आणि कृतिका देव मुख्य भूमिका साकारत आहेत. सध्या मालिकेत सखीच्या स्वयंवराचा भाग सुरू आहे. चेतन आणि कृतिकाने 'अल्ट्रा मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत मालिकेतील ट्रॅकबद्दल आणि त्यांच्या खऱ्या आयुष्यातील लग्नाबद्दल विचार मांडले. कृतिकाने लग्नाबद्दल विशेष विचार नसल्याचं सांगितलं, तर चेतनने लहानपणीच्या लग्नाच्या कल्पना शेअर केल्या. कृतिकाने अभिषेक देशमुखबरोबर लग्न केलं आहे, तर चेतनने रुजुता धारपबरोबर २०२४ मध्ये लग्न केलं.