“मालिकांमध्ये खलनायिकेला खूप…”,अभिनेत्रीचं वक्तव्य; म्हणाली, “तेव्हा ढसा ढसा रडले…”
टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री सुरभी भावे हिने मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारताना आलेल्या अनुभवांबद्दल सांगितले. सुरभीने खलनायिकेच्या भूमिकेतील आव्हानांबद्दल बोलताना म्हटले की, खऱ्या आयुष्यात आम्ही तसं वागत नाही, त्यामुळे अशा भूमिका साकारताना मज्जा येते. सुरुवातीला तिला त्रास व्हायचा, पण नंतर ती त्या भूमिकेत रुळली. खलनायिकेच्या नकारात्मक भूमिकांमुळे तिला सुरुवातीला अडचणी आल्या होत्या.