विक्की कौशलचा बहुचर्चित ‘छावा’ Deleted Scenes सह पाहता येणार, म्हणाला, “प्रेक्षकांना…”
विकी कौशलचा 'छावा' सिनेमा २०२५ मधील सर्वाधिक गाजलेला सिनेमा ठरला आहे. या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर येत्या रविवारी, १७ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता स्टार गोल्डवर होणार आहे. विशेष म्हणजे, या प्रीमियरमध्ये सिनेमातून काढून टाकलेले सीनही दाखवले जाणार आहेत. विक्की कौशलने स्टार गोल्ड राउंडटेबलमध्ये याची माहिती दिली आहे.