‘चल भावा सिटीत’ शो संपताच श्रेयस तळपदे भावुक, पोस्ट शेअर करत म्हणाला…
झी मराठीवरील 'चल भावा सिटीत' रिअॅलिटी शोचा महाअंतिम सोहळा १ जून रोजी पार पडला. अंतिम फेरीत पाच जोड्यांमध्ये चुरशीची लढत झाली आणि श्रुती राऊळ व ऋषिकेश चव्हाण यांनी बाजी मारली. शोचे सूत्रसंचालन श्रेयस तळपदेने केले. शो संपल्यानंतर श्रेयसने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचे आणि पडद्यामागच्या कलाकारांचे आभार मानले. दरम्यान, 'चल भावा सिटीत' रिअॅलिटी शोमधून ग्रामीण आणि शहरी जीवनाचा संगम पाहायला मिळाला.