श्रुती राऊळ-ऋषिकेश चव्हाण ठरले ‘चल भावा सिटीत’ शोचे पहिले विजेते, आनंद व्यक्त करत म्हणाले…
१५ मार्च रोजी सुरू झालेल्या झी मराठीवरील 'चल भावा सिटीत' या शोचा महाअंतिम सोहळा नुकताच १ जून रोजी पार पडला. या अंतिम फेरीत ऋषिकेश-श्रुती यांनी विजय मिळवला. शोचे विजेतेपद जिंकल्यानंतर श्रुती आणि ऋषिकेश यांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे. श्रुतीने पोस्टमध्ये असं म्हटलं ‘चल भावा सिटीत’ हा माझ्यासाठी केवळ एक शो नव्हता, तर तो एक प्रवास होता आणि आज मला सांगायला अभिमान वाटतो की, हा प्रवास मी जिंकले. तर ऋषिकेशने "‘चल भावा सिटीत सीझन १’चा पहिला विजेता म्हणून मला खूप चांगलं वाटत आहे" असं म्हटलं आहे.