ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे भिवंडीतील वस्त्रोद्योगावर संक्रांत; हजारो नोकऱ्या संकटात
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लागू केलेल्या ५० टक्के टॅरिफमुळे भिवंडीतील यंत्रमाग उद्योगावर मोठं संकट ओढवलं आहे. आधीच आर्थिक संकटात असलेल्या या उद्योगांना टॅरिफमुळे आणखी अडचणींचा सामना करावा लागत आहे. हजारो नोकऱ्यांवर संकट आले असून, अनेक कारखाने बंद होण्याच्या मार्गावर आहेत. भिवंडीतील यंत्रमाग उद्योगात ३० लाख कामगार कार्यरत आहेत, ज्यात सर्वाधिक भिवंडीतील आहेत.