लग्नातील ४०० वरातींमुळे वॉल स्ट्रीटवरील वाहतूक झाली संपूर्ण ठप्प
न्यूयॉर्कच्या वॉल स्ट्रीटवर भारतीय पद्धतीची वरात निघाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ४०० वराती डीजेच्या तालावर नाचत असल्याने वाहतूक ठप्प झाली. सलोनी मेहता यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला असून, त्यांनी या ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार असल्याचे म्हटले आहे. व्हिडीओत नवरा-नवरीही नाचताना दिसत आहेत. यावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.