“भटके कुत्रे त्रास नाहीत तर हृदयाचे ठोके आहेत”; रोहित शर्माच्या पत्नीची भावनिक पोस्ट
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या भटक्या कुत्र्यांबाबतच्या निर्देशांवर रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहने भावनिक पोस्ट लिहिली आहे. न्यायालयाने दिल्ली आणि एनसीआरमधील सर्व भटके श्वान हटवून आश्रयस्थानी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. रितिकाने कुत्र्यांना त्रास न मानता मित्र मानावे, त्यांची स्वच्छता, लसीकरण आणि निगा राखावी असे म्हटले आहे. कुत्र्यांना डांबून ठेवणे हा उपाय नाही, असे तिचे मत आहे.