मुंबईत एसी लोकलमध्ये प्रवाशाचा चक्क छत्री उघडून प्रवास, सोशल मीडियावर व्हायरल फोटोची चर्चा
मुंबई लोकल ही प्रवाशांची लाईफलाइन आहे. सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे ज्यात एसी लोकलमध्ये एक प्रवासी छत्री उघडून प्रवास करताना दिसतो आहे. हा फोटो एका रेडइट युजरने पोस्ट केला असून, युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींना वाटतं की तो छत्री वाळवतोय, तर काहींना वाटतं की तो प्रकाशापासून बचाव करतोय. ही घटना पहिली नाही; यापूर्वीही अशा घटना व्हायरल झाल्या आहेत.