Video:पुरुष साडी नेसून खेळतात गरबा, २०० वर्षांपूर्वीच्या घटनेमुळे केला जातोय आत्मक्लेश!
नवरात्रीच्या अष्टमीच्या दिवशी गुजरातमध्ये पुरुष साड्या नेसून गरबा खेळतात. ही प्रथा 'साडू माता नी पोळ' म्हणून ओळखली जाते. २०० वर्षांपूर्वी साडूबेन नावाच्या महिलेच्या शापातून मुक्तता मिळवण्यासाठी बारोत समुदायाच्या पुरुषांनी ही प्रथा सुरू केली. सोशल मीडियावर या प्रथेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यावर मोठी चर्चा सुरू आहे. अनेकांनी या प्रथेच्या धैर्य आणि महिलांच्या सन्मानाबद्दल प्रशंसा केली आहे.