डोनाल्ड ट्रम्प यांना दिली हिंदीतून शिवी; मुलाखतीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हेकेखोर वृत्तीमुळे रशिया, चीन, भारत यांना आंतरराष्ट्रीय दबावाला सामोरे जावे लागत आहे. अमेरिकन राज्यशास्त्राच्या तज्ज्ञ कॅरोल क्रिस्टीन फेअर यांनी पाकिस्तानी वंशाचे ब्रिटिश पत्रकार डॉ. मोईद पिरजादा यांना दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांच्याबद्दल संताप व्यक्त केला. फेअर यांनी ट्रम्प यांना हिंदीत शिवी दिली, ज्यामुळे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.