टिम कुकच्या नेतृत्वाखाली, Apple या जगातील सर्वात मोठी स्मार्ट उपकरण(डिव्हाईल) कंपनीचा फोल्डेबल स्मार्टफोन उद्योगात सामील होण्याचा मानस आहे. याव्यतिरिक्त, २०२६ पर्यंत Apple नवीन ७.९-इंच फोल्डेबल आयफोन लॉन्च करेल अशी अपेक्षा आहे. विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार, “हे नवीन गॅझेट त्याच्या “रॅप-अराउंड” डिझाइनसह बाजारात उपलब्ध असलेल्या इतर फोल्डिंग मॉडेल्सपेक्षा वेगळे असेल.

OnePlus, Oppo, Samsung आणि Vivo सारख्या कंपन्यांचे फोल्ड करण्यायोग्य स्मार्टफोन बाजारात आधीच उपलब्ध आहेत. ॲपल कंपनी पहिल्यांचा फोल्डेबल फोनच्या प्रकारातील पहिला फोल्डेबल आयफोन लॉन्च करत आहे ज्याचे अद्याप अनावरण करण्यात आलेले नाही.

तज्ञ जेफ पु( Jeff Pu) यांच्या मते, 9to5Mac च्या अहवालात असे सुचवण्यात आले आहे की,”Apple फोल्डेबल गॅझेट बाजारात आणण्याचा प्रयत्न करत आहे. Apple एक नवीन स्मार्टफोन रिलीज करणार आहे जो ७.९ इंच आणि फोल्ड करण्यायोग्य आहे.”

ह्युवाई मॅट Xs 2( Huawei Mate Xs 2) “ज्यामध्ये बाह्य फोल्डिंग डिस्प्ले आहे, फोल्डेबल आयफोनच्या डिझाइनला प्रेरणा देण्याचे श्रेय दिले जाते.”

विश्लेषक जेफ पु आणि मिंग-ची कुओ (Ming-Chi Kuo ) यांनी फोल्ड करण्यायोग्य उपकरणांसाठी ऍपलच्या व्यापक उद्दिष्टांकडे लक्ष वेधले आहे.

हेही वाचा –Apple Intelligence लाईव्ह इव्हेंट; आयपॅड, आयफोन, AI कोणत्या गोष्टींबद्दल होणार चर्चा? जाणून घ्या

ॲपल हायब्रिड फोल्डिंग टॅबलेट तयार करण्याचा देखील प्रयत्न करत आहे. याबाबत चर्चा आहे की, Apple२०.३च स्क्रीनसह हायब्रीड फोल्डिंग टॅब्लेटवर देखील काम करत आहे, जो २०२५ मध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. हे मोठे उपकरण, जे टॅबलेट आणि लॅपटॉप फंक्शन्स एकत्र करते, कदाचित Lenovo ThinkPad X1 Fold सारखे असू शकते.

अशी अपेक्षा आहे की, नव्या फोल्ड करण्यायोग्य आयफोनमध्ये “रॅप-अराऊंड” डिझाइन असेल, जे पारंपारिक फोल्डिंग स्मार्टफोनच्या कल्पनेपासून वेगळे आहे. या स्टाईलमध्ये स्मार्टफोन “रॅप-अराऊंड” करण्याची योजना आखण्यात आली आहे. या शोधामुळे फोल्ड करण्यायोग्य फोन तंत्रज्ञानाची लोकप्रियचा वाढेल आणि Apple च्या सुप्रसिद्ध शैली आणि कार्यक्षमतेमध्ये बसेल असा अंदाज आहे.

हेही वाचा – स्वस्तात खरेदी करा ‘हे’ Alexa पॉवर्ड स्मार्ट स्पीकर; स्पोर्ट्स पाहणे, कन्टेन्ट शोधण्यासाठी ठरेल उपयोगी; किंमत फक्त…

आगामी फोल्डेबल आयफोनवरील ७.९-इंच स्क्रीन स्क्रीन रिअल इस्टेटशी तडजोड न करता एक लहान आणि पोर्टेबल डिझाइन प्रदान करू शकते. असा अंदाज आहे की २०.३-इंचाचा फोल्डेबल स्मार्टफोन एक फ्रेक्सिबल मोबाईलचा अनुभव देईल, ज्यांना फोल्डेड फॉर्म फॅक्टर व्यतिरिक्त एक मोठा डिस्प्ले हवा आहे अशा व्यावसायिकांना आकर्षित करेल.

Apple नवीन फोल्डेबल आयफोनसह जनरेटिव्ह एआय स्पेस(generative AI space) मध्ये प्रवेश करेल असा अंदाज आहे, ज्यामुळे आयटी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

गोपनीयतेच्या वचनबद्धतेसह अत्याधुनिक डिझाइनचे कॉम्बिनेशन केल्याने उदयोन्मुख तंत्रज्ञान ट्रेंडशी जुळवून घेताना त्याचे बाजारातील नेतृत्व टिकवून ठेवण्यासाठी Apple च्या दृष्टिकोनावर प्रकाश टाकला पाहिजे.