अ‍ॅपलचा आयफोन १३ हा २०२२ मध्ये भारतात सर्वाधिक विक्री होणार स्मार्टफोन आहे. आयफोन १५ सिरीज १२ सप्टेंबर रोजी लॉन्च होणार आहे. त्याआधी आयफोन १३ हा सध्या मोठ्या सवलतीसह उपलब्ध आहे. म्हणजेच आयफोन १३ स्वस्तात खरेदी करण्याची संधी खरेदीदारांकडे आहे.Apple ही दिग्गज टेक कंपनी आहे. iPhone 15 या वर्षातील सर्वाधिक बहुप्रतीक्षित असा स्मार्टफोन आहे.  अ‍ॅपल कंपनीने मंगळवारी त्यांच्या वार्षिक आयफोन इव्हेंटचे आमंत्रण पाठवले आहे. ज्यात अनेक प्रॉडक्ट्स सादर १२ सप्टेंबर रोजी कंपनीच्या क्यूपर्टिनो, कॅलिफोर्निया येथील मुख्यालयात होणार असल्याची पुष्टी कंपनीने केली आहे. पाठवलेल्या आमंत्रणामध्ये या इव्हेंटला “Wonderlust” असे नाव देण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अ‍ॅपल आयफोन १३ २०२१ मध्ये ७९,९०० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च करण्यात आला होता. आयफोन १३ ला फ्लिपकार्ट वर विक्रीदरम्यान प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. सध्या हा फोन फ्लिपकार्टवर आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत उपलब्ध आहे. आयफोन १३ मध्ये कॅमेऱ्यासाठी सादर करण्यात आलेले डिझाइन कंपनी अजूनही फॉलो करत आहे. जर का तुम्ही एक प्रीमियमी फ्लॅगशिप लेव्हलचे डिव्हाइस खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल आणि तुमचे योग्य असे बजेट असेल तर तुमच्यासाठी आयफोन १३ हा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये वापरकर्त्यांना ६.१ इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले मिळतो. तसेच या फोनला A15 बायोनिक चिपसेटचा सपोर्ट देण्यात आला आहे. याबाबतचे वृत्त dnaindia ने दिले आहे.

हेही वाचा : Apple Event 2023: ‘या’ दिवशी लॉन्च होणार iPhone 15 सिरीज; कधी आणि कुठे पाहता येणार इव्हेंट?

आयफोन १३ मध्ये ४ के डॉल्बी व्हिजन HDR रेकॉर्डिंगसह १२ मेगापिक्सलचा ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप मिळतो. तसेच नाइट मोडसह १२ मेगापिक्सलचा ट्रू डेप्थ फ्रंट कॅमेरा देखील मिळतो. हा फोन १७ तासांचा व्हिडीओ प्लेबॅक ऑफर करतो असा कंपनीचा दावा आहे. अगदी कमी किंमतीमध्ये जवळजवळ आयफोन १४ प्रमाणेच स्पेसिफिकेशन्स ऑफर करतो.

काय आहे ऑफर ?

अ‍ॅपल आयफोन १३ २०२१ मध्ये ७९,९०० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च करण्यात आला होता. आयफोन १३ सध्या फ्लिपकार्ट सेलमध्ये ५२ हजारांच्या डिस्काउंटनंतर केवळ ६,९९९ रुपयांमध्ये खरेदीदारांना खरेदी करता येणार आहे. आयफोन १३ फ्लिपकार्टवर १०,९०१ रुपयांच्या डिस्काउंटनंतर ५८,९९९ रुपयांना लिस्टेड आहे. याशिवाय खरेदीदारांना HDFC बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या EMI व्यवहारांवर २ हजार रुपायांचा डिस्काउंट मिळवू शकता. यामुळे आयफोन १३ ची किंमत कमी होऊन ५६,९९९ रुपये इतकी होते. तसेच जुने स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास खरेदीदारांना ५० हजारांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतो. सर्व ऑफर्सचा विचार केल्यास खरेदीदार आयफोन १३ फ्लिपकार्टवरून केवळ ६,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकतात.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iphone 13 available 6999 rs after 52000 discount on hdfc bank check all offers tmb 01