प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते की, आपण Apple चे प्रॉडक्ट्स वापरावेत. त्यामध्ये आयफोन, स्मार्टवॉच आणि अन्य उपकरणांचा समावेश होतो. पण शक्यतो जास्त कल हा आयफोन खरेदी करण्याकडे लोकांचा पाहायला मिळतो. मात्र बजेट नसल्यामुळे कित्येकी जणांना आयफोन खरेदी करणे शक्य होत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयफोन १३ हा फोन लॉन्च होऊन आता एक वर्ष पूर्ण होत आले आहे. मात्र अजूनही या फोनची क्रेझ लोकांमध्ये दिसून येत आहे. बऱ्याच लोकांनी बजेट नसल्यामुळे हा फोन खरेदी केलेला नाही आहे. जर तुम्ही आयफोन १३ खरेदी करण्याचा विचार करत असाल तर फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या डिलकडे दुर्लक्ष करू नका. Flipkart Summer सेल हा १३ एप्रिलपासून सुरु झाला आहे. यामध्ये Phone 13, iPhone 14, Pixel 6a आणि इतर अनेक फोन्सवर ऑफर्स मिळत आहेत. आज आपण आयफोन १३ च्या ऑरबद्दल जाणून घेणार आहोत.

हेही वाचा : लेटेस्ट iPhone स्वस्तात खरेदी करण्याची संधी, १२ हजार रुपयांची होणार बचत, वाचा कुठे सुरु आहे ‘ही’ ऑफर

आयफोन १३ हा फ्लिपकार्टवर ५८,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे ही किंमत कोणत्याही बँकेच्या ऑफर किंवा एक्सचेंज ऑफरमध्ये समाविष्ट नाही आहे. हा फोन बँक आणि एक्सचेंज ऑर्समध्ये अजून कमी किंमतीत तुम्ही खरेदी करू शकणार आहात.

आयफोन १३ जो फ्लिपकार्टवर ६५,९९९ रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध होता, तोच फोन आता तुम्हाला विक्रीसाठी ५८,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. फ्लिपकार्ट आयफोन १३ वर डिस्काउंट देत आहे. तुम्हाला तुमच्या नवीन फोनची किंमत कमी करायची असेल तर तुम्ही तुमचा जुना आयफोन एक्सचेंज करून नवीन आयफोन २६,२५० रुपयांना खरेदी करू शकता. जुन्या फोनची किंमत ही त्याच्या मॉडेल आणि मेक इयरवर अवलंबून असते.

iPhone 13 चे स्पेसिफिकेशन्स

– iPhone 13 मध्ये ६.१ इंचाचा डिस्प्ले.
– A15 बायोनिक चिपसेट वर काम करतो.
– फोटोग्राफीसाठी ड्यूअल रियर कॅमेरा सेटअप.
– १२ एमपी चा प्रायमरी सेंसर.
– १२ एमपी अल्ट्रा वाइड लेंस उपलब्ध.
– १२ एमपी चा फ्रंट कॅमेरा.
– स्टारलाइट, मिडनाइट, ब्लू, पिंक आणि रेड कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Users buy iphone 13 under 60000 rs without bank offers at flipkart summer sale tmb 01