MS Dhoni Video : सध्या आयपीएल सुरू आहे. क्रिकेटच्या मैदानावरील अनेक खेळाडूंचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. रविवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामना जोरदार रंगला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने २० धावांनी विजय मिळवत विजयाचे खाते उघडले. जरी चेन्नई सुपर किंग्जला अपयश आले असले तरी धोनीला मैदानावर खेळताना पाहून चाहते खूश झाले. धोनीने १६ चेंडूमध्ये ३७ धावा काढल्या. सामना संपल्यानंतरचा धोनीचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये धोनी क्रिकेटच्या मैदानावर इशांत शर्माबरोबर बातचीत करताना दिसतो. या दरम्यान एक चाहता धोनीला असे काही म्हणतो की धोनी एक क्षणही वेळ न घालवता चाहत्यासाठी ती गोष्ट करतो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की धोनी इशांत शर्माबरोबर बोलताना दिसत आहे. अचानक चाहते “धोनी धोनी म्हणून ओरडायला सुरूवात करतात” तितक्यात एक चाहता म्हणतो, धोनी हेल्मट काढ.. धोनी हेल्मेट काढ” चाहत्याचे बोल कानावर पडताच धोनी हेल्मेट काढतो पण तो बोलण्यामध्ये व्यस्त असतो त्यामुळे चाहत्याकडे पाहत नाही. हेल्मेट काढताच धोनीचा चाहता जोराने म्हणतो, “धन्यवाद भावा” सध्या धोनीच्या या कृतीचे सगळीकडे कौतुक केले जात आहे. धोनीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. जो त्याच्यासाठी आयपीएल बघतो तर काही लोक धोनीच्या प्रेमापोटी चेन्नई सुपर किंग्जला फॉलो करतात. आयपीएल आली की धोनीचे अनेक जुने नवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.

हेही वाचा : ‘सीट’वरून दोन महिलांमध्ये तुफान राडा, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, VIDEO होतोय व्हायरल

@Diptiranjan_7 या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “एका चाहत्याने हेल्मेट काढायला सांगितल्यावर धोनीने त्याचे हेल्मेट काढले. चाहत्यांवर त्याचे प्रेम कायम आहे.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “अतिशय दयाळू कॅप्टन आहे” तर एका युजरने लिहिलेय, “धोनी खूप परफेक्ट माणूस आहे.” अनेक युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला. काही युजर्सनी व्हिडीओ पाहून हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.