Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतो. अनेकदा सार्वजानिक ठिकाणी अशा घटना घडतात, की त्या घटना पाहून कोणीही डोकं धरेल. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका बसमध्ये दोन महिला सीटसाठी वाद घालताना दिसत आहे. त्यांचा वाद इतका वाढतो की त्या दोघीही एकमेकांच्या अंगावर धावून येतात. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ दिल्लीच्या एका बसमधील आहे. व्हिडीओत तुम्हाला दोन महिला भांडताना दिसत आहे. एक महिला दुसऱ्या महिलेचे केस ओढताना दिसत आहे आणि तिला मारताना दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की दोघीही एकमेकीच्या अंगावर हात उचलत आहे. बसमधील अन्य प्रवासी त्यांचा वाद संपवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे पण त्या महिला कुणाचेही ऐकत नाही.अखेर एक महिला तिथे येते आणि मध्यस्थी करत या दोघींना दूर करते. त्यानंतर त्या दोघी शांत होतात. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. चालत्या बसमधील हा प्रकार सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. काही लोकांनी या महिलांवर जोरदार टिका केली आहे. हा व्हिडीओ जूना आहे जो पुन्हा सध्या चर्चेत आला आहे.

Children should be given water break in schools advises by paediatrician
शाळांमध्ये मुलांना ‘पाणी सुट्टी’ द्यावी, बालरोग तज्ज्ञांचा सल्ला
natepute, murder, Solapur,
सोलापूर : नातेपुतेजवळ क्षुल्लक कारणांवरून मेव्हणा आणि भावजीचा खून
rishi sunak
ब्रिटनमध्ये स्थलांतरितांचं प्रमाण घटवणार, नव्या नियमांमुळे ८० टक्के अर्जांमध्ये घट; ऋषी सुनक यांची माहिती
When Indian young woman wears saree and takes over streets of Japan
Video : जेव्हा भारतीय तरुणी जपानच्या रस्त्यावर साडी नेसून फिरते, तेव्हा.. पाहा व्हायरल व्हिडीओ
KKR Seo on Rohit Sharma Abhishek Nayar Viral Video
IPL 2024: रोहित शर्मा-अभिषेक नायर ‘त्या’ व्हायरल व्हीडिओमध्ये नेमकं काय बोलत होते? KKR च्या सीईओने केला खुलासा
Loksatta viva Summer dew Summer drinks
उन्हाळ्यातील गारवा!
bikes become expensive due to high tax says rajiv bajaj
जास्त करामुळे दुचाकी महागल्या! राजीव बजाज यांची टीका; नियामक चौकटीकडेही बोट
npci bank of namibia sign an agreement to develop upi like system
नामिबियामध्ये ‘यूपीआय’सारखी प्रणाली विकसित करण्यासाठी एनपीसीआय करारबद्ध

Delhi Roads problems या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “सीट एक आणि बसणारे अनेक,आता काय कारवाई केली पाहिजे कोणी सांगेल का? अनेक जण म्हणतात महिलांसाठी फ्री तिकीट केले, चांगले आहे. पण या ठिकाणी पुरुष असता तर त्याच्यावर कारवाई झाली असती. हे १० रुपये सरकारचे पैसा नाही तर आपला पैसा आहे.
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “अशा घटना बसमध्ये मी दररोज पाहतो. यावर कारवाई केली पाहिजे. एकतर सर्व बस महिलांसाठी करा नाहीतर महिलांच्या राखीव सीटचे प्रकरण थांबवा” तर एका युजरने लिहिलेय, “बसमध्ये हे दररोज पाहायला मिळते. सीटसाठी असो किंवा कोणतेही कारण महिला एकमेकांशी भांडताना दिसतात. जय केजरीवाल” आणखी एका युजरने लिहिलेय, “ही फुकट मिळण्याची खाज आहे”