Viral Video: आजकाल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. युजर्स नेहमीच अशा व्हिडिओंच्या शोधात असतात, ज्यामध्ये खूप मनोरंजन असते. कुठलीही चोरी करण्यापूर्वी चोर प्रचंड अभ्यास करतात असं म्हटलं जातं. सर्वात आधी ते वस्तूचं बारीक निरिक्षण करतात. ती वस्तू कशी चोरता येईल या बद्दत नियोजन आखतात. अन् चोरी फसलीच तर काय करायचं याबाबतही प्लान बी रेडी असतो. चोरांना इतकी तयारी ही करावीच लागते. कारण चोरी करणं हा गुन्हा आहे. अन् जर तुम्ही पकडला गेलात तर तुमची काही खैर नाही. पोलीस नंतर मारतात आधी पब्लिकच चांगली धुलाई करते. अन् शेवटी तुरुंगाची हवा खावी लागते हे तर वेगळंच. याच पार्श्वभूमीवर एका चोर टोळी सध्या चर्चेत आहे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंजाबमधील अमृतसरमध्ये तीन सशस्त्र दरोडेखोरांनी एका मेडिकल स्टोअरमध्ये घुसून बंदुकीच्या धाकावर दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना मेडिकल स्टोअरमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तीन सशस्त्र तरुणांनी दुकानात घुसून बंदुकीच्या जोरावर दुकान लुटल्याचे व्हिडिओत दिसत आहे. अमृतसरमधील एका मेडिकल स्टोअरमध्ये ही घटना घडली. चेहऱ्यावर मास्क लावलेले तीन तरुण दुकानात घुसले आणि त्यांनी दुकानात काम करणार्‍या कर्मचाऱ्यांवर बंदुकीचा धाक दाखवला. दरोड्याच्या वेळी दुकानात दोन जण उपस्थित होते. दरोडेखोरांना पाहून ते घाबरले आणि ते काउंटरच्या मागे उभे राहिले. दरोडेखोरांनी दुकानात उपस्थित असलेल्या व्यक्तींना कॅश काउंटरमध्ये जी काही रोकड आहे ती देण्यास सांगितले.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: चोरानं अंडरवेअरमध्ये लपवली दारुची बाटली; पुढच्याच क्षणी व्यक्तीसोबत घडलं भयानक

दरम्यान, दरोडेखोरांपैकी एकाने काउंटर ओलांडून कॅश काउंटरच्या आत जाऊन रोकड लुटली. दरोडेखोरांनी दुकानावर दरोडा टाकला तेव्हा दुकानात पुरेशी रोकड नव्हती. निराश झाल्यानंतर दरोडेखोरांनी दुकानातील मौल्यवान वस्तू लुटण्याचा निर्णय घेतला. त्यांनी चॉकलेट, परफ्यूम, फेस वॉश आणि शॅम्पू गोळा करायला सुरुवात केली. या वस्तू लुटून त्यांनी दुकानातून पळ काढला. ही संपूर्ण घटना दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Robbers steal chocolates perfumes face wash after not finding enough cash at amritsar store video viral on social media srk