scorecardresearch

मार्क वुड News

मार्क वुड (Mark Wood) हा इंग्लंडकडून खेळणारा वेगवान गोलंदाज आहे. १४५-१५० वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. तो एक उत्कृष्ट स्विंग गोलंदाज आहे.


मागील काही वर्षांमध्ये इंग्लंडच्या संघासाठी (Team England) खेळताना मार्क वुडने चांगली कामगिरी केली आहे. एक्स्प्रेस डिलिव्हरी, उंच बाउन्स यांच्या बळावर त्याने संघामध्ये स्थान पक्कं केलं आहे. अनेकदा इंग्लंडच्या संघाला संकटातून बाहेर काढण्यासाठी त्याने मदत केली आहे. चांगला खेळ करण्याची क्षमता पाहून त्याला २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठीच्या इंग्लंडच्या संघामध्ये सामील करण्यात आले होते. हा विश्वचषक इंग्लंडमध्ये असल्याचा फायदा मार्कसह इंग्लंडच्या अन्य गोलंदाजांना झाला होता.


मार्क वुडने विश्वचषक २०१९ (World Cup 2019) मध्ये एकूण १८ गडी बाद केले होते. सर्वात चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या सहा गोलंदाजांमध्ये त्याचा समावेश होता. इंग्लंडला पहिला-वहिला विश्वचषक जिंकण्यासाठी त्याने मदत केली होती. यंदाच्या एकदिवसीय विश्वचषकामध्येही त्याने चांगला खेळ करुन दाखवावा अशी अपेक्षा त्यांच्याकडून इंग्लंडच्या संघाला आहे.


Read More
Mark Wood out for the year with an elbow injury
ENG vs SL : इंग्लंड संघाला मोठा धक्का! वेगवान गोलंदाज मार्क वुड यंदा क्रिकेट खेळणार नाही; नेमकं काय आहे कारण?

ENG vs SL Massive Setback for England : पाकिस्तान आणि न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. संघाचा त्यांचा दिग्गज…

Kavem Hodge reveals about Mark Wood funny conversation
ENG vs WI 2nd Test : ‘भावा, घरी बायका मुलं आहेत जरा बेताने…’, वेगवान मार्क वूडला केव्हिन हॉजचं सांगणं, पाहा VIDEO

Kavem Hodge on Mark Wood : मार्क वुडने वेस्ट इंडिजविरुद्ध वेगवान मारा करत सर्वांच लक्ष वेधले, मात्र तो विकेट घेण्यात…

Mark Wood Fiery Bouncer Dismisses Azam Khan Video
मार्क वुडच्या बाऊन्सरवर आझम खानला दिसले तारे, डोळे बंद करून खेळताना विचित्र पद्धतीने झाला आऊट, पाहा VIDEO

Mark Wood Bouncer To Azam Khan Video : पाकिस्तानचा फलंदाज आझम खानचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये…

Sarfaraz Khan Ramp Shot Frustrates Mark Wood
VIDEO: सर्फराझचा वुडच्या गोलंदाजीवर सचिन स्पेशल शॉट, धुलाई पाहून मार्क भडकला आणि…

Sarfaraz Khan and Mark Wo: सर्फराज खानने पाचव्या कसोटीत मार्क वुडच्या गोलंदाजीवर एकापेक्षा एक जबरदस्त शॉट्स मारले, ते पाहून वुड…