मेष

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ॐ प्रबुध्दाय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल. धाडसी निर्णय घेऊ शकाल. नवीन योजनांचा पाठपुरावा करावा. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. उत्तम आर्थिक स्थितीचे योग आहेत.
आजचा रंग – पांढरा

वृषभ

ॐ स्वस्वरूपाय नमः मंत्राने दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. कौटुंबिक समस्या सोडवू शकाल. नातेवाईकांशी, आप्तेष्ठांशी भेटीचे योग आहेत. बांधकाम व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. प्रवास जपून करावेत.
आजचा रंग –फिक्कट पिवळा

मिथुन

ॐ जगद्‌पालकाय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. वादविवाद टाळावेत. व्यावसायिक स्पर्धेचे योग आहेत. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक नियोजन योग्य करू शकाल. भावंडांशी वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – तपकिरी

कर्क

ॐ शांभवैय नमः मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. आर्थिक नियोजन उत्तम करू शकाल. व्यावसायिकांना आणि नोकरदार मंडळींना उत्तम ग्रहमान आहे. महत्त्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. आर्थिक नियोजन उत्तम करू शकाल. उत्तम आर्थिक स्थितीचे योग आहेत.
आजचा रंग – निळा

सिंह

ॐ ईश्वराय नमः मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. ग्रहांच्या अनुकूलतेमध्ये व्यावसायिक स्थिरता प्राप्त होईल. प्रवासामध्ये दक्षता घ्यावी. सर्वांशी सुसंवाद राहील. वेळेचा योग्य वापर करावा. नियोजनबध्द दिवसाची आखणी करावी.
आजचा रंग – मोरपंखी

कन्या

ॐ प्रजापतैय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. मोठे निर्णय सावधपणे घ्यावे. कुठल्याही कामात दिरंगाई नको. प्रवास जपून करावेत. आर्थिक व्यवहारामध्ये दक्षता बाळगावी.
आजचा रंग – जांभळा

तुळ

ॐ भार्गवाय नमः मंत्राने दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये अनुकूल वातावरण आहे. आर्थिक स्थिरता प्राप्त होईल. व्यावसायिक नियोजन उत्तम राहील. कमोडिटी, मार्केट, शेअर्समध्ये अनुकूल ग्रहमान आहे.
आजचा रंग – मोरपंखी

वृश्चिक

ॐ वरदायिने नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. अधिकार संपन्नता येईल. उत्तम आर्थिक नियोजन करू शकाल. अनेकांचे सहकार्य लाभेल. गुरू बदलाचा लाभ होईल. बांधकाम व्यावसायिक, स्थावर मालमत्तेशी निगडीत व्यवसायिकांना अनुकूल ग्रहमान आहे.
आजचा रंग –गुलाबी

धनु

ॐ सोमाय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. प्रगतीकारक ग्रहमान आहे. व्यवसाय, नोकरीमध्ये प्रतिष्ठा प्राप्त होईल. अनेक नवीन योजना राबविता येतील. वादविवाद टाळावेत. प्रवास जपून करावेत. दूरच्या प्रवासाचे योग आहेत.
आजचा रंग – हिरवा

मकर

ॐ चिदंबराय नमः मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. मोठे व्यावसायिक धाडस नको. प्रकृतीची काळजी घ्यावी. प्रवासामध्ये दक्षता घ्यावी. कमोडिटी, शेअर्स, मार्केट व्यवसायिकांनी सावधपणे गुंतवणूक करावी. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – पोपटी

कुंभ

ॐ खगाय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. व्यवसायामध्ये अनुकूल ग्रहमान राहील. अडचणींवर मात करू शकाल. नवीन संधी उपलब्ध होतील. पती, पत्नींमधील दुरावा कमी होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
आजचा रंग- जांभळा

मीन

ॐ दामोदराय नमः मंत्राने दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत आहे. आर्थिक नियोजन सावधपणे करावेत. कुठल्याही स्वरूपाचे वादविवाद टाळावेत. सहकाऱ्यांशी, कामगारांशी सुसंवाद राखावा. मोठे आर्थिक नियोजन करताना सावधानता बाळगावी.
आजचा रंग – राखाडी

 

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi monday 16 october