Niyati Palat Rajyog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी शुभ आणि अशुभ ग्रह तयार करतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर होतो. फेब्रुवारीमध्ये ग्रहांच्या हालचालीमध्ये सर्वात मोठा बदल होणार आहे. शनिदेवाने १७ जानेवारीला आपली राशी बदलली आहे आणि गुरु स्वतःच्या मीन राशीत गोचर करत आहे. तसेच, फेब्रुवारीच्या सुरुवातीला शुक्र ग्रह मीन राशीत प्रवेश करेल. दुसरीकडे, मंगळ वृषभ राशीत गोचर करत आहे. या सर्व ग्रहांची युती आहे. ज्यामुळे ४ राशींना चांगले परिणाम मिळू शकतात. कारण या सर्व ग्रहांच्या हालचालीमुळे मालव्य आणि हंस नावाचा राजयोग तयार होणार आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिथुन राशी

नियती पालट राजयोग तुमच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण तुमच्या संक्रमण कुंडलीत दशम स्थानात हंस आणि मालव्य राजयोग तयार होत आहेत. तसेच शनिदेवाचे भाग्य स्थानावर आहे. त्यामुळे शनिदेवाच्या प्रभावामुळे तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. यासोबतच गुरू आणि शुक्राच्या प्रभावामुळे ज्यांना नोकऱ्या नाहीत त्यांना नोकरीच्या ऑफर येऊ शकतात. तसेच, नोकरी करणाऱ्या लोकांना यावेळी पदोन्नती आणि वेतनवाढ होऊ शकते. दुसरीकडे, जे व्यवसायात आहेत त्यांना या काळात विशेष लाभ मिळू शकतो. याकाळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे.

कर्क राशी

हा राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण ही युती तुमच्या संक्रमण कुंडलीच्या त्रिकोणी घरावर तयार होत आहे. कारण शुक्र ग्रह श्रेष्ठ आहे आणि गुरु स्वतःच्या राशीत बसला आहे. त्यामुळे यावेळी तुम्ही एखादे नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. यासोबतच तुमच्या सुखसोयींमध्येही वाढ होईल. याशिवाय गुरूच्या प्रभावामुळे तुम्ही धार्मिक आणि शुभ कार्यात सहभागी होऊ शकता. याकाळात तुम्हाला शेअर्समध्ये नफा मिळू शकतो. दुसरीकडे, ज्या लोकांचा व्यवसाय खाद्यपदार्थ आणि रेस्टॉरंटशी संबंधित आहे त्यांना विशेष फायदा होऊ शकतो.

कन्या राशी

नियती पालट राजयोग कन्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण तुमच्या राशीतून सातव्या भावात गुरु आणि शुक्राचा संयोग तयार होणार आहे. म्हणूनच यावेळी तुमचे उत्पन्न वाढू शकते. यासोबतच वैवाहिक जीवनात काही मतभेद सुरू असतील ते या काळात दूर होतील. यासोबत तुम्ही नवीन व्यावसायिक करार करू शकता. तुम्हाला याकाळात पैशांची कमी भासणार नाही कारण हंस आणि मालव्य राजयोगही तयार होत आहेत. त्यामुळे सामाजिक प्रतिष्ठाही वाढेल.

( हे ही वाचा: १२ वर्षांनंतर तयार होणार गुरु आणि सूर्यदेवाची युती; ‘या’ ३ राशी होणार श्रीमंत? मिळू शकतो बक्कळ पैसा)

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीसाठी नियती पालट राजयोग आर्थिकदृष्ट्या चांगला सिद्ध होऊ शकते. कारण ही युती तुमच्या राशीतून पाचव्या घरात तयार होईल. जे प्रगती, प्रेमविवाह आणि धनलाभाचे स्थान मानले जाते. त्यामुळे प्रेमविवाह करणाऱ्यांसाठी हा काळ शुभ असेल. तसंच यावेळी तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची देखील शक्यता दिसत आहे. तसंच याकाळात तुम्हाला वडिलांची साथ मिळू शकते. ज्यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागतील.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Niyati palat rajyog will make in february these zodiac sign can get huge amount of money gps