Royal Enfield Hunter 350 ने एका वर्षापेक्षा कमी कालावधीत दोन लाखांहून अधिक युनिट्स विकून ग्राहकांना आकर्षित करण्यात यश मिळवले आहे. रॉयल एनफिल्डने सांगितले की, त्यांच्या हंटर 350 बाईकने सादर झाल्यानंतर एका वर्षापेक्षा कमी कालावधीत एकूण दोन लाख युनिट्सचा आकडा पार केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रॉयल एनफिल्डने निवेदनात म्हटले आहे की, कंपनीने ऑगस्ट २०२२ मध्ये हंटर 350 मॉडेल सादर केले होते, या मॉडेलने फेब्रुवारी २०२३ मध्ये १ लाख युनिटच्या विक्रीचा आकडा गाठला होता आणि अवघ्या ५ महिन्यांत पुढील १ लाख युनिट्सची विक्री नोंदवली आहे.

Royal Enfield Hunter 350 इंजिन

Royal Enfield Hunter 350 मध्ये ३४९ cc इंजिन देण्यात आले आहे. जे २०.२ bhp पॉवर आणि २७ Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. ही बाईक ११४ किमी/ताशी कमाल वेग देते. यासोबतच या इंजिनमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. हंटर 350 चे वजन १८१ किलो आहे. जे क्लासिक 350 पेक्षा १४ किलो कमी आहे. या बाईक बॉडीत कंपनीने अनेक ठिकाणी प्लॅस्टिकचा वापर केले आहे. याच्या फ्रेममध्येही बदल करण्यात आला आहे. यात नवीन अलॉय व्हील देण्यात आले आहेत. ज्यामुळे याचे वजन कमी झाले आहे.

(हे ही वाचा : ‘या’ स्वस्त अन् सुरक्षित ७ सीटर कारच्या खरेदीसाठी ग्राहकांची चेंगराचेंगरी, मायलेज २६KM, पण वेटिंग पीरियड… )

Royal Enfield Hunter 350 फीचर्स

रॉयल एनफील्डची सर्वात स्वस्त बाइक हंटर ३५० मध्ये सेमी डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, ट्रिपल नेव्हीगेशन पॉड (ऑप्शनल), ड्युअल चॅनेल एबीएस, टेलिकस्कोपिक फ्रंट फॉर्क्स, ड्युअल रियर शॉक अब्जॉर्बर, १७ इंचाची अलॉय व्हील, ३०० एमएम फ्रंट डिस्क ब्रेक आणि २७०mm रियर डिस्क ब्रेक सह अन्य खास फीचर्स दिले आहेत.

Royal Enfield Hunter 350 किंमत

या बाईकची किंमत १.५० लाख रुपये ते १.६९ लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Royal enfield recently announced that its hunter 350 roadster motorcycle has crossed the 2 lakh sales milestone pdb