जागतिक व्यापार संघटनेसंदर्भातील भारत आणि अमेरिका यांच्यात असलेल्या सहा प्रलंबित समस्यांची परस्पर सहमतीच्या उपायांच्या माध्यमातून सोडवणूक करण्याबाबत जून २०२३ मध्ये झालेल्या निर्णयानुसार भारताने सफरचंदे, अक्रोड आणि बदाम यांच्यासह अमेरिकेत निर्मित आठ उत्पादनांवर लावलेले अतिरिक्त कर रद्द केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमेरिकेने संरक्षणात्मक उपाययोजना म्हणून काही पोलाद आणि अल्युमिनियम उत्पादनांवरील शुल्क वाढवल्याच्या निर्णयावर प्रत्युत्तर म्हणून भारतातर्फे सर्वाधिक पसंतीचे राष्ट्र यासाठी (एमएफएन) असलेल्या कराशिवाय सफरचंदे तसेच अक्रोड यांच्यावर २० टक्के आणि बदामांवर २० रुपये प्रतिकिलो असा अतिरिक्त कर लावण्यात आला होता. काही उत्पादने करांतून वगळण्याच्या प्रक्रियेअंतर्गत अमेरिकेने काही पोलाद आणि अल्युमिनियम उत्पादनांना बाजारात प्रवेश देण्यास मान्यता दिल्यानंतर भारताने अमेरिकी उत्पादनांवर लावलेले अतिरिक्त कर रद्द केलेत. सफरचंद, अक्रोड आणि बदाम यांच्यावरील सर्वाधिक पसंतीच्या देशांसाठी असलेल्या करात कोणतीही कपात करण्यात आली नसून अमेरिकेत उत्पादित वस्तूंसह आयात करण्यात येणाऱ्या सर्व उत्पादनांसह त्यांच्यावर अनुक्रमे ५० टक्के, १०० टक्के आणि १०० रुपये प्रति किलो कर यापुढेही लागू असेल.

हेही वाचाः रिटेल क्षेत्रात भरपूर नोकऱ्यांची संधी; रिलायन्स रिटेल, ट्रेंट, टायटन यांसारख्या कंपन्या देणार रोजगार

तसेच डीजीएफटीने ८ मे २०२३ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार सफरचंदांच्या आयात धोरणात आयटीसी (एचएस) ०८०८१००० अंतर्गत सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार भूतानखेरीज इतर सर्व देशांकडून आयात केल्या जाणाऱ्या सफरचंदांवर किलोमागे ५० रुपयेइतकी एमआयपी (किमान आयात किंमत) लागू असेल. म्हणून हाच एमआयपी (भूतानखेरीज) अमेरिका आणि इतर सर्व देशांतून आयात केल्या जाणाऱ्या सफरचंदांवर लागू आहे. या सुधारणेमुळे कमी दर्जाची सफरचंदे आयात केली जाण्यापासून तसेच भारतीय बाजारांमध्ये महाग दराने त्यांची विक्री होण्यापासून संरक्षण मिळेल.

हेही वाचा: Money Mantra : बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी फेस्टिव्हल ऑफर लाँच; गृह आणि वाहन कर्जांवर विशेष सूट

या निर्णयामुळे देशातील सफरचंद, अक्रोड आणि बदाम उत्पादक शेतकऱ्यांवर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही. खरे तर यातून सफरचंदे, अक्रोड आणि बदाम या महत्त्वाच्या बाजार घटकातील स्पर्धेला चालना मिळेल आणि त्यातून आपल्या भारतीय ग्राहकांना अधिक किफायतशीर दरात उत्तम दर्जाची उत्पादने मिळण्याची सुनिश्चिती होणार आहे. म्हणजेच अमेरिकेत उत्पादित सफरचंद, अक्रोड आणि बदाम आता इतर देशांतील याच फळांबरोबर एका पातळीवर येऊन स्पर्धा करतील. अतिरिक्त कर रद्द झाल्यामुळे या उत्पादनांची भारताला निर्यात करणाऱ्या सर्वच देशांमध्ये न्याय्य स्वरुपाची स्पर्धा होताना पाहायला मिळेल.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taxes on us apples and walnuts will still be in place abolition of only 20 percent additional tax vrd