एकाच वेळी चार तरुणींना फिरवणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. चारही प्रेयसी एकाच वेळी घऱी पोहोचल्याने तरुणाची चांगलीच भंबेरी उडाली. यानंतर तरुण इतका घाबरला की त्याने थेट आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पश्चिम बंगालमधील कूचबिहार येथे ही घटना घडली असून परिसरात एकच चर्चा रंगली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेडिकल स्टोअरमध्ये काम करणारा हा तरुण आपल्या घरी पोहोचला तेव्हा त्याच्या चारही प्रेयसी तिथे होत्या. या चौघींनाही तो एकाच वेळी डेट करत होता. चारही तरुणींना जेव्हा याची कल्पना आली तेव्हा त्यांनी थेट तरुणाचं घऱ गाठलं. यानंतर तरुणींना त्याला जाब विचारण्यास सुरुवात केला. यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला होता.

प्रकरण वाढत असल्याचं लक्षात येताच तरुणाने घरात धाव घेतली आणि विष प्यायला. यानंतर शेजाऱ्यांनी तरुणाला घेऊन रुग्णालयात धाव घेतली. तिथे त्यांना जिल्हा रुग्णालयात जाण्यास सांगण्यात आलं. तरुणाची प्रकृती सध्या गंभीर आहे. दुसरीकडे तरुणींनी कोणतीही तक्रार दिली नसल्याने पोलिसांनी काही कारवाई केलेली नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A youngster attempt suicide after cornered by four girlfriends in west bengal sgy