भाजपाने बिहार शेतकऱ्यांसाठी १००० शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) स्थापण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर कृषी पायाभूत सुविधांसाठी केंद्र सरकारने १ लाख कोटींचा निधी तयार केल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. समस्तीपूर येथे निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बिहारमधील राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसवर टीका करताना मोदी म्हणाले, एकीकडे एनडीए लोकशाहीसाठी प्रतिबद्ध आहे. तर दुसरीकडे ‘परिवार तंत्र गठबंधन’ आहे. एनडीचं सरकार हे ‘सबका साथ, सबका विकास’ यासाठी आहे. आत्ता इथं जमलेला मोठा जनसमुदाय पाहूनच मी स्पष्टपणे सांगू शकतो की १० नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल काय असणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp to set up 1000 farmer producer organizations in bihar modis announcement at the campaign rally aau