चारा घोटाळाप्रकरणी शिक्षा झालेले राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालुप्रसाद यादव यांनी दाखल केलेली जामीन याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली असून, त्याप्रकरणी सीबीआयला नोटिस पाठवण्यात आली आहे. सीबीआयने दोन आठवडय़ात नोटिशीला उत्तर द्यावे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
चारा घोटाळाप्रकरणी लालुप्रसाद यादव यांना पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली आहे. मात्र त्यांना जामीन देण्यास या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने विरोध केला आहे. त्याबाबत त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
‘‘चारा घोटाळाप्रकरणी शिक्षा झालेल्या ४४ दोषींपैकी लालुप्रसाद एक दोषी आहेत. मात्र केवळ त्यांचाच जामीन अर्ज स्थानिक आणि उच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आला. या प्रकरणी इतर ३७ दोषींनी जामीनअर्ज केला होता आणि त्या सर्वाचा अर्ज स्वीकारण्यात आला. मग लालुप्रसाद यांचा अर्ज का स्वीकारू नये,’’ असा सवाल लालुप्रसाद यांचे वकील राम जेठमलानी यांनी विचारला आहे.
लालुप्रसाद यांचा जामीन अर्ज झारखंड उच्च न्यायालयाने फेटाळला होता.
चारा घोटाळाप्रकरणी दोषी आढळल्यानंतर लालुप्रसाद यांचे संसद सदस्यत्वही रद्द करण्यात आले होते.
संग्रहित लेख, दिनांक 30th Nov 2013 रोजी प्रकाशित
चारा घोटाळा प्रकरण :सर्वोच्च न्यायालयाची सीबीआयला नोटीस
चारा घोटाळाप्रकरणी शिक्षा झालेले राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालुप्रसाद यादव यांनी दाखल केलेली जामीन याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली असून, त्याप्रकरणी सीबीआयला नोटिस पाठवण्यात आली आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 30-11-2013 at 01:44 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fodder scam sc issues notice to cbi on lalus bail plea