इम्रान खान यांची पत्नी बुशरा बिबी यांच्या एका मैत्रिणीने पाकिस्तान सोडल्यानंतर तिचा एक फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती एका विमानातून लक्झरी हँडबॅग आणि किमती वस्तू घेऊन जाताना दिसत आहे. ही मैत्रिण म्हणजे फराह खान रविवारी दुबईला निघून गेली. तिच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा


ट्विटरवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होणारा ह्या फोटोमध्ये फराह खानच्या पायाशेजारी एक महागडी बॅग दिसत आहे. हा फोटो कधी घेतलाय याबद्दल मात्र ठोस काहीही कळत नाहीये. पाकिस्तानच्या विरोधी पक्षांनी मात्र यावरून मोठ्या प्रमाणावर टीका करण्यास सुरूवात झाली आहे. ही बॅग ९० हजार डॉलर्सची असल्याची टीका विरोधक करत आहेत. पाकिस्तान मुस्लीम लिग नवाझ पक्षाच्या नेत्या रोमिना खुर्शीद आलम यांनी ट्विटरवरून फोटो शेअर करत टीका केली आहे.


या फोटोवर इतर ट्विटर युजर्सकडूनही प्रतिक्रिया आल्या आहेत. “खाजगी जेटने दुबईला जाण्यासाठी फक्त ५० हजार यूएस डॉलर्सपेक्षा जास्त खर्च येतो. हर्मीस सँडल,” एका वापरकर्त्याने सांगितले. खान यांचे पती तिच्या आधी पाकिस्तान सोडून गेले होते. पाकिस्तानातील विरोधी पक्षांचा आरोप आहे की फराह खानला अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि त्यांच्या आवडीनुसार नियुक्ती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे मिळाले, त्यांनी या घोटाळ्याला ६ अब्ज पाकिस्तानी रुपयांचा घोटाळा ($32 दशलक्ष) “सर्व घोटाळ्यांची जननी” म्हटले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Friend of imran khans wife fled pakistan with 90000 bag claims opposition vsk