वास्को येथील शाळेच्या शौचालयातच सात वर्षांच्या लहान मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला एका महिन्यानंतरही पकडण्यात गोवा पोलीस अपयशी ठरले आहेत. पोलिसांच्या या ढिसाळ कामगिरीमुळे नागरिकांमध्ये कमालीचा संताप व्यक्त करण्यात येत आहे.
  मार्मुगाव पोर्ट ट्रस्टच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या शाळेतील शौचालयात महिन्याभरापूर्वी एका सात वर्षांच्या विद्यार्थिनीवर अज्ञात व्यक्तीने अत्याचार केला होता.  याप्रकरणी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत निष्काळजीपणा बाळगल्याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिका शार्लेट फुर्ताडो यांना अटक करण्यात आली तसेच या घटनेनंतर पीडित विद्यार्थिनीला आंघोळ घालून तसेच शौचालयात साफसफाई करून महत्त्वाचे पुरावे नष्ट केल्याप्रकरणी शाळेच्या कर्मचाऱ्यांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र त्यांना अटक करण्यात आलेली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goa rape matter accused still abscond after a month