आरोपीला जामीन मिळाल्याचा मेल तुरुंग अधिकाऱ्यांना उघडता आला नाही, यामुळे संबंधित आरोपीला तीन वर्षांची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागली असल्याचा धक्कादायक प्रकार गुजरातमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी संबंधिताला १ लाखांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश गुजरात उच्च न्यायालायने दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२७ वर्षीय युवक चंदन ठाकूर हत्येच्या आरोपाखाली आजन्म कारावासाची शिक्षा भोगत होता. परंतु, २०२० मध्ये त्याची शिक्षा कमी करण्यात आली आणि त्याला जामीन देण्यात आला. परंतु, जामीन मिळाल्यानंतरही चंदनची ठाकूर तीन वर्षे तुरुंगात शिक्षा भोगत होता.

चंदन ठाकूर याला जामीन मिळाल्याचा मेल रजिस्ट्रीद्वारे तुरुंग अधिकाऱ्यांना पाठवण्यात आला होता. २०२० मध्ये त्याला जामीन मिळाला होता. परंतु, त्यावेळी कोरोना निर्बंध असल्याने तुरुंग अधिकारी अधिक कार्यवाही करू शकले नाहीत. तसंच, तुरुंग अधिकाऱ्यांना मिळालेल्या मेलमध्ये असलेली अटॅचमेंट फाईल तुरुंग अधिकारी उघडू शकले नाहीत. त्यामुळे चंदन ठाकूरच्या जामीनाची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली नाही. परिणामी, चंदन ठाकूरला अतिरिक्त शिक्षा भोगावी लागली.

गुजरात उच्च न्यायालायने म्हटलं की, तुरुंग अधिकाऱ्यांना जामिनाचा मेल प्राप्त झाला नाही, असं नाही. परंतु, कोविड महामारीमुळे तुरुंग अधिकाऱ्यांना कार्यवाही करता येत नव्हती. त्यांना मेल मिळाला होता, परंतु, मेलमध्ये असलेली फाईल ते उघडू शकले नाहीत. याचिकाकर्त्याला जामीन मिळाला होता. त्यामुळे तो त्याच्या जगण्याचा आनंद घेऊ शकत होता. परंतु, त्याला तीन वर्षे तुरुंगात राहावे लागले. रजिस्ट्रीने पाठवलेल्या मेलसंदर्भातील तक्रारीविषयी तुरुंग अधिकाऱ्यांनी रजिस्ट्री किंवा सत्र न्यायालयाशी संपर्क साधला नाही.”

परिणामी, या प्रकरणात तुरुंग अधिकारी दोषी असून १४ दिवसांत चंदन ठाकूर याला १ लाखांची नुकसान भरपाई देण्याचे गुजरात उच्च न्यायालायने आदेश दिले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujarat hc grants 1 lakh compensation to man who spent 3 years in jail as authorities couldnt access his bail order sent on e mail sgk