पीटीआय, नवी दिल्ली

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संयुक्त राष्ट्रांच्या मानव विकास निर्देशांकाच्या (एचडीआय) भारताच्या क्रमवारीत २०२२ मध्ये एका स्थानाची सुधारणा झाली आहे.  १९३ देशांपैकी भारताचे स्थान १३५ वरून १३४ झाले आहे. २०२१ मध्ये या निर्देशांकात १९१ देशांचा सहभाग होता.

लैंगिक असमानता निर्देशांक (जीआयआयम्)मध्ये २०२२मध्ये, भारत ०.४३७ गुणांसह १९३ देशांमध्ये १०८ क्रमांकावर आहे. तर २०२१ मध्ये भारत जीआयआयमध्ये ०.४९० गुणांसह १९१ देशांमध्ये १२२ क्रमांकावर होता. २०२१ च्या तुलनेत जीआयआयच्या आकडेवारीत १४ क्रमांकानी सुधारणा झाली असल्याचे महिला आणि बाल विकास मंत्रालयाने म्हटले आहे.

तथापि, देशाच्या श्रमशक्तीच्या सहभागाच्या दरामध्ये स्त्री आणि पुरुषांच्या सहभागात मोठे अंतर आहे. स्त्रियांचा सहभाग २८.३ टक्के  तर पुरुषांचा सहभाग ७६.१ टक्के आहे. त्यातील फरक यांच्यात ४७.८ टक्के फरक आहे.

हेही वाचा >>>Electoral Bond Data: EC कडून निवडणूक रोख्यांची इत्यंभूत माहिती जाहीर, भाजपाला मिळाली छप्परफाड देणगी

युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या ‘ब्रेकिंग द ग्रिडलॉक: रीइमॅजिनिंग कोऑपरेशन इन अ पोलराइज्ड वल्र्ड’ या अहवालात ही आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. २०२२ मध्ये, भारताने आयुर्मान, शिक्षण आणि दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीएनआय) यासह सर्व एचडीआय निर्देशकांमध्ये सुधारणा केली. या अंतर्गत, आयुर्मान ६७.२ वरून ६७.७ वर्षे झाले आहे. ‘‘भारताने गेल्या काही वर्षांत मानवी विकासात उल्लेखनीय प्रगती पाहिली आहे,’’ असे अहवालात म्हटले आहे. १९९० पासून, जन्माच्या वेळी आयुर्मान ९.१ वर्षांनी वाढले आहे, शालेय शिक्षणाची अपेक्षित वर्षे ४.६ वर्षांनी वाढली आहे तर शालेय शिक्षणाची सरासरी वर्षे ३.८ वर्षांनी वाढली आहे.

भारताचा दरडोई जीएनआय सुमारे २८७ टक्क्यांनी वाढला आहे,’’ असे त्यात म्हटले आहे. ‘‘प्रजनन आरोग्यामध्ये भारताची कामगिरी दक्षिण आशियातील इतर देशांपेक्षा चांगली आहे,’’ असे मंत्रालयाने म्हटले आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, गेल्या १० वर्षांमध्ये, जीआयआयमध्ये भारताचा क्रमांक सातत्याने चांगला झाला आहे, जे देशात लैंगिक समानता साध्य करण्यासाठी सुधारणा दर्शवते. २०१४ मध्ये  जीआयआय १२७ क्रमांकावर होता जो आता १०८ झाला आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या मानव विकास निर्देशांकात भारताचे स्थान १९३ देशांमध्ये १३४ झाले आहे. यात एका अंकाची सुधारणा झाली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Improvement in india position in human development index amy