गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंसारखेच लोकप्रिय आहेत. नेहरूंप्रमाणेच त्यांना देशव्यापी समर्थन असून नेहरुंप्रमाणेच त्यांनी पंतप्रधान व्हावे अशी सामान्य जनतेची इच्छा असल्याचे  प्रशस्तिपत्रक विश्व हिंदू परिषदेचे ( विहिंप )ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक सिंघल यांनी दिले आहे.
भाजपच्या काही नेत्यांनी पक्षाने मोदींना पंतप्रधानपदाची उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीला विश्व हिंदू परिषदेनेही पाठिंबा दिला आहे. येथे सुरू असलेल्या कुंभ मेळ्यात भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह हे विहिंप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. या भेटीच्या पाश्र्वभूमीवर सिंघल यांनी हे विधान करून मोदींना समर्थन दिले आहे. विहिंपने गुरुवारी आयोजित केलेल्या धर्मसंसदेमध्ये मोदींच्या पंतप्रधानपदाच्या मुद्दय़ावर कोणतीही चर्चा होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi is as popular as nehru singhal