हिंदू धर्मग्रंथ वाचणाऱ्या एका मुस्लीम व्यक्तीला मुस्लीम युवकांनी मारहाण केल्याची घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. गुरुवारी ५५ वर्षीय दिलशेर आपल्या घरामध्ये हिंदू धर्मग्रंथ वाचत असताना झाकीर आणि समीर हे दोन तरुण त्यांच्या घरामध्ये घुसले व त्यांना मारहाण केली. दिलेशर १९७९ सालापासून ‘राम चरित्र मानस’ आणि ‘गीता’ या हिंदू ग्रंथांचे वाचन करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

झाकीर आणि समीरने त्यांची बाजाची पेटी मोडली व त्यांचे धर्मग्रंथ सोबत घेऊन गेले. हे ग्रंथ वाचू नका अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिलशेर यांना देण्यात आली. दिलशेर सुरक्षा रक्षकाचे काम करतात.

मी डयुटीवरुन परतल्यानंतर आंघोळ करुन ‘राम चरित्र मानस’ वाचण्याची तयारी करत होतो. त्यावेळी हे युवक माझ्या घरात घुसले व त्यांनी मारहाण केली. हिंदू ग्रंथ वाचून मला मानसिक शांतता मिळते. माझ्या समाजानेच वेळोवेळी माझा विरोध केला आहे. दिल्ली गेट पोलीस स्थानकात दिलशेर यांनी तक्रार नोंदवली आहे.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Muslim man attacked for reading hindu scriptures uttar pradesh dmp