पाकिस्तानकडून वारंवार भारताला तोडण्याचे प्रकार सुरु असून त्यांच्याकडून धार्मिक विद्वेषही पसरवला जात आहे. सीमेपलिकडून वारंवार गोळीबारही केला जात आहे. मात्र, आपले जवान त्यांना जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. मात्र, याची काळजी करु नका कारण त्यांना पुन्हा जागेवर आणण्याची आपल्यात धमक आहे, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. ते बिहारमधील पटना येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा


पाकिस्तानला इशारा देताना राजनाथ म्हणाले, देशातील हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचे काम करु नका. कारण, भगतसिंह आणि चंद्रशेखर आझाद यांनी देशासाठी बलिदान दिले तसेच अश्फाकउल्लाह खान यांनी देखील भारतासाठी सर्वोच्च बलिदान दिले आहे. पाकिस्तानकडून कितीही फूट पाडण्याचा प्रयत्न झाला तरी आम्ही देशाचे शिर कधीही झुकू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी आपल्या भाषणात देशवासियांना उद्देशून दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistans religious hatred spreads through break the nation says rajnath singh