अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे वेगवेगळ्या राज्यांत झालेल्या नुकसानाची राज्य सरकारांनी दिलेली माहिती विश्वसनीय वाटत नाही. त्याची चौकशी केली पाहिजे, हे विधान केले आहे देशाचे कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी. त्यांच्या या विधानामुळे विरोधकांसोबतच भाजपचीच सत्ता असलेल्या राज्यांमधील सरकारे अडचणीत येण्याची शक्यता आहे.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे देशभरातील शेतकऱयांचे झालेले नुकसान यावर लोकसभेमध्ये नियम १९३ अंतर्गत चर्चा झाली. या चर्चेला उत्तर देताना राधामोहन सिंह यांनी विविध राज्य सरकारकडून नुकसानीची माहिती पूर्णपणे मिळाली नसल्याचे सांगितले. या माहितीमध्ये सातत्याने बदल होतो आहे. ताज्या माहितीनुसार ९३ लाख हेक्टर जमिनीवरील पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला असल्याचे त्यांनी सांगितले. याच उत्तरामध्ये त्यांनी महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे तीन शेतकऱयांनी आत्महत्या केल्याचे सांगितले. त्यांच्या या मुद्द्यावरून विरोधकांनी त्यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्याला उत्तर देताना राज्य सरकारांनी दिलेली माहिती विश्वसनीय वाटत नाही. त्याची चौकशी केली पाहिजे, असे मत त्यांनी मांडले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Radhamohan singhs statement on nonseasonal rain