बेकायदेशीर पद्धतीने शिकार करणाऱ्या टोळक्याच्या हल्ल्यात आणखी एका गेंडय़ाचा बळी गेला आहे. जगभरात प्रसिद्ध असलेल्या काझिरंगा अभयारण्यात ही दुर्घटना घडली असून त्यामुळे या वर्षांतील मृत गेंडय़ांचा आकडा १३ वर पोहोचला आहे.
शिंग, नखे आणि कातडी काढून घेतलेले गेंडय़ाचे मृत शरीर उत्तररात्री टेहळणी करणाऱ्या पथकाला पावणेदोन वाजता सापडले. त्याच्याजवळच रबरी हातमोजे, तसेच ३०३ रायफल आणि एके-४७ च्या गोळ्यांच्या पुंगळ्याही सापडल्याचा दावा अभयारण्याच्या प्रशासनाने केला आहे.
शिकाऱ्यांचा शोध घेण्यासाठी जंगल अधिकाऱ्यांनी व्यापक मोहीम हाती घेतली आहे. तर या शिकारीने व्यथित झालेल्या नागरिकांनी अभयारण्यातील सुरक्षा वाढविण्यात यावी तसेच सुरक्षेच्या नावाखाली स्थानिक रहिवाशांचा छळ करू नये, अशी मागणी करीत प्रशासकीय अधिकाऱ्यांना घेराव घातला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rhino hunted in kaziranga sanctuary