अरब आघाडीने त्यांच्या हेलिकॉप्टरवाहू युद्धनौका येमेनच्या सीमेवर आणून ठेवल्या आहेत. सीमेवरील चकमकीत काही सौदी सैनिक मारले गेल्यानंतर या युद्धनौका जवळ आणून ठेवल्या आहेत.
सौदी आघाडीचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल अहमद अल असिरी यांनी सांगितले,की आम्ही तोफगोळ्यांचा मारा अपाची हेलिकॉप्टरमधून करणार आहोत.
हुथी बंडखोरांनी शुक्रवारी सीमेवर नाजरान येथील लष्करी चौकीवर मारा केला. हे ठिकाण सौदी अरेबियाच्या नैऋत्येकडे असून, तेथे येमेनने केलेल्या हल्ल्यात सौदी अरेबियाचे तीन सैनिक मारले गेले होते, असे संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.
२६ मार्चला सौदी आघाडीने हुथी बंडखोरांवर हल्ले सुरू केल्यानंतर मारले गेलेले ते पहिलेच सैनिक आहेत. सौदी अरेबियाला अशी भीती वाटते आहे की, हुथी बंडखोर सगळा येमेन ताब्यात घेऊन इराणच्या हद्दीत जाऊन त्यांना मिळतील. इराण हा सौदी अरेबियाचा विरोधक मानला जातो. दरम्यान, आमच्या सैनिकांची हानी सहन करणार नाही असे असिरी यांनी सांगितले.
एएफपीच्या वार्ताहराने सांगितले की, सौदी अरेबियाचे रणगाडे, दारूगोळा व इतर सामग्री नैऋत्य सीमेवर नेण्यात आली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या मते हवाई हल्ल्यानंतर ५०० बंडखोर ठार झाले आहेत. हा आकडा कुठून काढला असे विचारले असता असिरी यांनी सांगितले की, कॅमेरे, व्हिडिओ, इन्फ्रारेडच्या माध्यमातून आम्ही हा आकडा सांगतो आहोत. शिवाय अपाची हेलिकॉप्टर्सही लक्ष्य निश्चित करू शकतात.
संग्रहित लेख, दिनांक 13th Apr 2015 रोजी प्रकाशित
येमेनच्या सीमेवर युद्धनौका सज्ज
अरब आघाडीने त्यांच्या हेलिकॉप्टरवाहू युद्धनौका येमेनच्या सीमेवर आणून ठेवल्या आहेत. सीमेवरील चकमकीत काही सौदी सैनिक मारले गेल्यानंतर या युद्धनौका जवळ आणून ठेवल्या आहेत.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 13-04-2015 at 11:03 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: War boats ready at yemen border