प्रसिद्ध उद्योजक व काँग्रेसचे खासदार नवीन जिंदाल यांच्या कंपनीकडे १०० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप असलेले झी न्यूजचे दोन वरिष्ठ संपादक सुधीर चौधरी व समीर अहलुवालिया यांची शुक्रवारी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. दिल्लीचे महानगरदंडाधिकारी गौरव राव यांनी चौधरी व अहलुवालिया यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या दोघांचीही चौकशी पूर्ण झाली असून त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नाही, त्यामुळे त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी व्हावी अशी मागणी दिल्लीच्या गुन्हे अन्वेषण विभागाने केली होती. उभयतांतर्फे जामीन अर्ज दाखल करण्यात आला असून त्यावरील सुनावणी आज, शनिवारी होणार आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 01-12-2012 at 02:09 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zee news editors sent to judicial custody