Earphones & Headphones : आपल्यापैकी अनेक जण दररोज इअरफोन आणि हेडफोनचा वापर करतात. इअरफोन आपण सहसा फोन-कॉलसाठी वापरतो, तर हेडफोन आपण गाणी ऐकताना, चित्रपट पाहताना किंवा ऑनलाइन गेम खेळताना वापरतो; पण तुम्हाला माहिती आहे का इअरफोन आणि हेडफोन या दोनपैकी कशाचा वापर करणे चांगले आहे? आज आपण त्याविषयीच जाणून घेऊ या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इअरफोन आणि हेडफोन आरोग्यासाठी चांगले नाही, असे अनेक रिसर्चमधून समोर आले आहे. मुळात आवाज आणि ऐकण्याच्या कालावधीवर अवलंबून आहे की हेडफोन किंवा इअरफोन आरोग्यावर किती विपरीत परिणाम करू शकतात.

हेही वाचा : नवऱ्यांनो, परफेक्ट बायकोमध्ये असतात हे पाच गुण; एकदा वाचाच…

इअरफोन आकाराने लहान असल्यामुळे कानात फिट बसतात; त्यात बाहेरचा आवाजही तुम्हाला सहजपणे ऐकू येतो. पण, बाहेरचा आवाज ऐकू येऊ नये म्हणून तुम्ही जर इअरफोनचा आवाज वाढवत असाल, तर ते आरोग्यासाठी अधिक धोकादायक ठरू शकते.
आवाजाचा विचार केला, तर हेडफोन तुमच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. कारण- हेडफोन वापरताना बाहेरचा आवाज येत नाही आणि तुम्ही कमी आवाजात गाणी ऐकू शकता.

इअरफोनचा वापर तुम्ही तासन् तास करीत असाल, तर ही सवय तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकते. जर तुम्ही एक तास सातत्याने गाणी ऐकत असाल, तर त्याचा दुष्परिणाम तुमच्या कानावर होऊ शकतो.
एका एमपी3 प्लेअरमधून इअरफोनमध्ये १०० डेसिबल आवाज येऊ शकतो. इतका आवाज तुमच्या कानाच्या आरोग्यासाठी चांगला नाही. वैज्ञानिक सांगतात की, ८५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज आपल्या कानांसाठी धोकादायक आहे.

हेही वाचा : ‘या’ वयात करा लग्न; दीर्घकाळ टिकेल नातं; वाचा संशोधन काय सांगते …

ज्याप्रमाणे इअरफोनच्या आवाजामुळे धोका निर्माण होतो, त्याप्रमाणे हेडफोनच्या अतिवापरामुळेही इअर इन्फेक्शन होऊ शकते. हेडफोन पूर्ण कानात उष्णता निर्माण करतो; ज्यामुळे बॅक्टेरिया वाढतात आणि सहजपणे इन्फेक्शन होते. पण, काही संशोधनामध्ये असे सांगितले आहे, की हेडफोनमुळे इअर इन्फेक्शनचा धोका निर्माण होत नाही

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Earphones and headphones which is the best one use ndj