BJP Mega Maharashtra Campaign, Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचाराची सभा घेतली. या सभेतून त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रचाराचा नारळ फोडला. काँग्रेस बरोबर आहे ती नकली शिवसेना आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. तसंच बाळासाहेब ठाकरेंचं उदाहरण देऊन त्यांनी काँग्रेसविरोधात ते कसे उभे राहिले होते हेदेखील त्यांच्या भाषणात सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुढीपाडव्याच्या मराठीतून शुभेच्छा

उद्यापासून गुढीपाडवा नवं पर्व सुरु होतं आहे. सगळ्या बंधू भगिनींना गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. २०२४ लोकसभा निवडणूक हा स्थैर्य आणि अस्थिरता यांच्यातला लढा आहे. एकीकडे भाजपा आणि एनडीए आहे. भाजपा आणि एनडीए देशासाठी महत्त्वाचे निर्णय घेते आहे. दुसरीकडे आहे काँग्रेस आणि त्यांची इंडी आघाडी. सत्ता भोगा आणि मलई खा हे त्यांचं ध्येय आहे. एक स्थिर सरकार किती आवश्यक असतं हे महाराष्ट्राशिवाय आणखी कुणाला जास्त समजणार? जोपर्यंत देशात देशात त्यांचं (इंडी आघाडी) सरकार होतं, महाराष्ट्राची उपेक्षाच होत राहिली असा आरोप नरेंद्र मोदींनी केला. आज चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींनी पहिली सभा घेत प्रचाराचा नारळ फोडला. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.

PM Narendra Modi in Chandrapur : “कमिशन द्या नाहीतर प्रकल्प थांबवा असं उद्धव ठाकरेंच्या मविआ सरकारचं धोरण होतं”, पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीका

आणखी काय म्हणाले नरेंद्र मोदी?

“आपल्या कर्मांमुळे काँग्रेस पक्षाने पाठिंबा गमावला आहे. काँग्रेस आता फोडा आणि राज्य करा हे धोरण अवलंबलं आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुस्लीम लीगची भाषा आहे. हे देश स्वीकारणार आहे का? यांचे खासदार भारताच्या फाळणीची भाषा करत आहेत. इंडि आघाडीचे लोक दक्षिण भारत वेगळा करु म्हणत आहेत. द्रमुकचे लोक सनातन धर्माला डेंग्यू, मलेरिया म्हणत आहेत. अशा काँग्रेसच्या लोकांना नकली शिवसेनेचे लोक महाराष्ट्रात आणून रॅली करतात.

बाळासाहेब ठाकरेंचं उदाहरण देत काय म्हणाले मोदी?

“काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले मोदी देशात जिथे कुठे जातात तिथे काश्मीरबाबत का बोलतो? हा फाळणीचा विचार नाही का? छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीविरोधात भूमिका घेतली तेव्हा ते म्हणाले का दिल्लीत जे होतंय त्याचा माझा काय संबंध? लोकमान्य टिळक म्हणाले होते का की जालियनवाला बाग हत्याकांड आणि माझा काय संबंध? काश्मीरमध्ये जेव्हा काश्मिरी पंडितांची घरं जाळण्यात आली तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसच्या विरोधात उभे राहात भूमिका घेतली होती. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे असं नाही म्हणाले की काश्मीरमध्ये आग लागली आहे तर महाराष्ट्रातल्या लोकांचा काय संबंध? मला आनंद आहे की एकनाथ शिंदेंची शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे घेऊन जात आहे.” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi speech in chandrapur he gave an example of balasaheb thackeray aad kashimr issue scj
First published on: 08-04-2024 at 18:19 IST