चलन टंचाईमुळे शेतकऱ्यांची अडचण होऊ लागली असताना या वर्गाने अर्थव्यवहारातील नवे तंत्र अवगत करावे यासाठी शासन  प्रयत्न करत आहे. त्याचा एक मुख्य भाग म्हणून कृषी निविष्ठांच्या खरेदीची रक्कम ‘ऑनलाइन’अदा करण्याच्या कार्यपद्धतीसाठी शेतकऱ्यांना धडे दिले जात आहेत. यानुसार बियाणे, खते, कीटकनाशके या कृषी साहित्याची खरेदी ‘ऑनलाइन’ पद्धतीने करण्यास सुरुवात केली जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्ह्य़ातील शेतकरी वर्ग चलन टंचाईमुळे अडचणीत आला आहे. बहुतेक शेतकऱ्यांची खाती जिल्हा मध्यवर्ती बँकेत आहेत. या बँकांना अनेक र्निबध घातले आहेत . परिणामी शेतकऱ्यांना हक्काचे पसे मिळणे अशक्य झाले आहे. रब्बी हंगाम सुरु झाल्याने शेतीच्या कामासाठी शेतकरी पशासाठी अडून  राहिला आहे. यावर शासनाने कृषी निविष्ठांच्या खरेदीची रक्कम ऑनलाईन पद्धतीने अदा करण्याबाबतच्या कार्यपद्धतीसाठी शेतकऱ्यांना शिक्षित करण्याचे ठरवले आहे. अर्थव्यवस्था कॅशलेस करण्याचे केंद्र शासनाचे धोरण असून यासाठी विविध मार्गाचा अवलंब करण्यात येत आहे. बियाणे, खते, कीटकनाशके या कृषी निविष्ठांची खरेदी शेतकऱ्यांकडून रोखीने  केली जाते. चलन टंचाईमुळे अशा खरेदीत अडचणी येऊ नयेत म्हणून शेतकऱ्यांनी ऑनलाईन खरेदीची रक्कम अदा करायची आहे.

अशी आहे प्रक्रिया

ऑनलाइन पद्धतीने रक्कम अदा करण्यासाठी शेतकरी, खाते ज्या बँकेत आहे, त्या बँकेतून निविष्ठा विक्री केंद्रधारकाच्या खात्यावर बियाणे, खते, कीटकनाशके यांच्या खरेदी बिलाची रक्कम जमा करू शकतात. यासाठी शेतकऱ्याने दुकानदाराकडून घ्यावयाच्या निविष्ठांची रक्कम निश्चित करून घ्यायची.  दुकानदाराकडून त्याची कच्ची पावती, बँक खाते क्रमांक, बँकेसंदर्भातील तपशील लिहून घ्यायचा आहे. हा तपशील भरुन शेतकऱ्याच्या बँकेतील खात्यावर निविष्ठाच्या रकमेएवढी स्लिप भरून घ्यायची.  यानंतर बँकेद्वारे शेतकऱ्याच्या खात्यावरून दुकानदाराच्या खात्यावर निविष्ठाची रक्कम जमा होईल.

 

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Internet banking information for farmers