टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतून ९१ किलो वजनी गटात खेळणारा बॉक्सर सतीश कुमार बाहेर पडला आहे. उपांत्यपूर्व फेरीत उझबेकिस्तानचा गतविजेता आणि विश्वविजेता बखोदिर जलोलोवने सतीशला स्पर्धेबाहेर ढकलले. चुरशीच्या झालेल्या या लढतीत तिन्ही फेऱ्यांत जलोलोव प्रभावी ठरला. असं असलं तरी, सतीशने खेळलेल्या बॉक्सिंगचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. या सामन्यापूर्वी सतीश जखमी झाला होता. मात्र तरीही उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात रिंगमध्ये उतरला. जमैकाच्या रिकार्डो ब्राउनविरुद्धच्या सामन्यात सतीशच्या हनुवटीवर आणि उजव्या डोळ्याला मार बसला होता. यानंतर त्याला ७ टाके पडले. सतीशने हा सामना ४-१ असा जिंकला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टाके लागल्यानंतर तो मैदानात उतरला आणि लढला. त्याने जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी असलेल्या बॉक्सरविरुद्ध शरणागती पत्करली नाही. तो लढत राहिला. या सामन्यात त्याला मार बसलेल्या ठिकाणी ठोसा बसला. तेव्हा त्या भागातू रक्त वाहत होते. ही स्पर्धा हरला तरी त्याच्या कामगिरीचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. या सामन्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्या चेहऱ्यावर एकूण १३ टाके पडले आहेत. “माझ्या हनुवटीला सात टाके आहेत आणि माझ्या कपाळावर आणखी सहा टाके पडले आहेत. मी मारू नाही तर काय करू, मला लढायचे होते. नाही तर मला खेदाने जगावं लागलं असतं. आता मी शांततेत जगू शकतो. मी माझा सर्वोत्तम खेळ केला. माझ्या पत्नीने मला लढू नका असं सांगितलं. माझ्या वडिलांनाही तसेच सांगितलं. मला झालेली दुखापत त्यांना बघवत नव्हती. मी त्यांना विश्वास दिला लढणं योग्य आहे”, असं सतीश कुमार यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं.

Video : भारतीय हॉकी संघाचा विजयानंतर जेव्हा कॉमेंटेटरच आनंदाने रडू लागले

“बॉक्सर सतीश कुमारचा जयघोष करा. त्याने जगाला दाखवून दिलं आहे खरा प्रतिस्पर्धी कसा असतो. तुझा अभिमान आहे”, असं ट्वीट अभिनेता फरहान अख्तर याने केलं आहे. “यालाच खेळ भावना बोलतात. जखमी असूनही सतीश कुमारने लढा दिला. विजेता बखोदिरनंही सतिशला बाहेर जाण्यासाठी दोर वर केला.”, असं ट्विट अभिनेता रणदीप हुड्डाने केलं आहे.


टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताकडून एकूण ९ बॉक्सर सहभागी झाले होते. पण फक्त एका बॉक्सरने पदकाला गवसणी घातली. महिलांच्या वेल्टरवेट प्रकारात लव्हलीनाने हे पदक निश्चित केले आहे. हेवीवेट प्रकारात ऑलिम्पिक रिंगमध्ये प्रवेश करणारा सतीश कुमार हा पहिला भारतीय बॉक्सर ठरला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Boxer satish kumar a fighter with 13 stitches is being praised rmt