Yashasvi Jaiswal breaks Rohit and Sehwag’s record : रांची कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात यशस्वी जैस्वालने एक षटकार ठोकताच, तो भारतासाठी कसोटी फॉरमॅटमध्ये एका संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला. त्याने याबाबतीत कर्णधार रोहित शर्मालाही मागे टाकले. त्याचबरोबर त्याने एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा वीरेंद्र सेहवागचा विक्रम मोडला आहे. रांची कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात यशस्वी जैस्वालने आपले अर्धशतक झळकावल्यानंतर बाद झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यशस्वी जैस्वालने रोहित शर्माला टाकले मागे –

रांची कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात यशस्वी जैस्वालने षटकार ठोकताच, इंग्लंडविरुद्धच्या या कसोटी मालिकेतील हा त्याचा २३वा षटकार ठरला. या षटकारासह, तो कसोटीत एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला. याआधी या क्रमांकावर कर्णधार रोहित शर्मा उपस्थित होता, ज्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत आतापर्यंत २२ षटकार मारले होते, पण इंग्लंडविरुद्ध २३ षटकार मारून यशस्वीने त्याला तिसऱ्या क्रमांकावर ढकलले आणि स्वतः दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. भारताकडून एकाच संघाविरुद्ध कसोटीत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम सध्या सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे, ज्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २५ षटकार ठोकले होते.

एका संघाविरुद्ध कसोटीत सर्वाधिक षटकार ठोकणारे भारतीय फलंदाज –

२५ षटकार – सचिन तेंडुलकर – विरुद्ध ऑस्ट्रेलिया
२३ षटकार – यशस्वी जैस्वाल – विरुद्ध इंग्लंड
२२ षटकार – रोहित शर्मा – विरुद्ध दक्षिण आफ्रिका वि
२१ षटकार – कपिल देव – विरुद्ध इंग्लंड
२१ षटकार – ऋषभ पंत – विरुद्ध इंग्लंड

हेही वाचा – IND vs ENG 4th Test : ‘इसको हिंदी नहीं आती’; सर्फराझ खानने खिल्ली उडवताच, शोएब बशीरने दिले चोख प्रत्युत्तर

एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक कसोटी षटकारांसह भारताचे फलंदाज

यशस्वी जैस्वाल: २०२४ मध्ये २३* षटकार

वीरेंद्र सेहवाग : २००८ मध्ये २२ षटकार

ऋषभ पंत : २०२२ मध्ये २१ षटकार

रोहित शर्मा: २०१९ मध्ये २० षटकार

मयंक अग्रवाल: २०१९ मध्ये १८ षटकार

हेही वाचा – Ranji Trophy : ‘चांगली कामगिरी केली आहेस, पण…’ पहिले शतक झळकावण्यापूर्वी सर्फराझने मुशीरला काय सल्ला दिला होता?

यशस्वी जैस्वालच्या ६०० धावा पूर्ण –

यशस्वी जैस्वालने रांची कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात ५५ धावा करताच या कसोटी मालिकेत आपल्या ६०० धावा पूर्ण केल्या. याआधी त्याने पहिल्या तीन कसोटी सामन्यात दोन द्विशतकांच्या मदतीने ५४५ धावा केल्या होत्या. यशस्वीने दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडविरुद्ध २०९ धावांची खेळी केली, तर तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याने २१४ धावांची नाबाद खेळी साकारली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs eng yashasvi jaiswal breaks rohit sharma and virender sehwags record by hitting a six in ranchi test vbm