दोन वेळा ऑलिम्पिक विजेत्या लिन डॅनवर मात करून चीन स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या किदम्बी श्रीकांतने जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या क्रमवारीत पुरुष एकेरीत कारकीर्दीतील सर्वोत्तम आठव्या स्थानी झेप घेतली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या पारुपल्ली कश्यपने एका क्रमांकाच्या सुधारणेसह १६वे स्थान प्राप्त केले आहे. सौरभ वर्मा आणि आनंद पवार हे अनुक्रमे ३५व्या आणि ४३व्या स्थानी आहेत. एच. एस. प्रणॉय २६व्या तर बी. साईप्रणीथ ४१व्या क्रमांकावर आहे. महिलांमध्ये, सायना नेहवालने चौथे स्थान कायम राखले आहे. पी. व्ही. सिंधू हिची अव्वल १० जणींमधून घसरण झाली असून ती ११व्या स्थानी पोहोचली आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 28-11-2014 at 08:59 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kidambi srikanth rises to no 8 in the world