हरयाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील हलालपूर गावात गोळीबार झाल्याचे वृत्त समोर आले होते. राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू निशा दहिया आणि तिच्या भावाची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली, अशा बातम्या आल्या. मात्र हे वृत्त चुकीचे आहे. निशाची प्रकृती उत्तम असून तिनेच एका व्हिडिओद्वारे ही माहिती दिली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने हा व्हिडिओ समोर आणला आहे. वृत्तानुसार, निशा गोंडा येथे वरिष्ठ कुस्ती स्पर्धा खेळण्यासाठी गेली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की प्रकार काय?

हलालपूर येथील सुशील कुमार कुस्ती अकादमीत निशा दहिया आणि तिच्या भावाची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली, असे वृत्त समोर आले होते. या घटनेत निशा आणि तिचा भाऊ सूरजचा जागीच मृत्यू झाला आणि त्यांची आई धनपती यांची प्रकृती गंभीर असून तिला रोहतक पीजीआयमध्ये पाठवण्यात आले असल्याचे खोटे वृत्त समोर आले होते. मात्र मी ठीक असून मला काहीही झालेले नाही, असे निशाने सांगितले.

निशाने गेल्या आठवड्यात बेलग्रेड येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. जागतिक २३ वर्षांखालील कुस्ती चॅम्पियनशिपच्या ६५ किलो वजनी गटात तिला हे पदक मिळाले. ती नुकतीच देशात परतली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wrestler nisha dahiya and her brother killed by unknown assailants in haryana adn